
जागतिक महिला दिन विशेष म्हणून महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन
मातृत्वापासून बायकोपर्यंत, बहिणीपासून आणि शेवटी मुलीपर्यंतच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘स्त्री’ या मजबूत सहयोगीशिवाय या जीवनाचे अस्तित्व नाही , म्हणूनच जागतिक महिला दिन विशेष म्हणून महिलांसाठी प्रेरित फाऊंडेशनने हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन
दिनांक ०८/०३/२०२२ जळोची येथे जागतिक महिला दिनासारख्या विशेष दिनी प्रेरित फौंडेशन तर्फे हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले.ह्या शिबिरामध्ये ८० स्त्रियांचे हिमोग्लोबिन तपासले गेले.
बारामतीच्या माजी नगरसेविका नीलिमा मालगुंडे, अशा माने ,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती छाया जमदाडे , छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका राणी ढवाण, जळोची गावच्या माजी सरपंच अरुणाताई पागळे ,जळोचीच्या माजी उपसरपंच अनुसया जमदाडे ,वनिता सातारकर ,उज्वला जमदाडे ,वंदना सातव ,मनीषा जमदाडे, रेश्मा जमदाडे ,अंगणवाडी सेविका शिंदे व गावातील इतर महिला यांचा समावेश होता .हिमोग्लोबिन तपासणीसाठी विघ्नहर्ता लॅब्रॉटरीचे सहकार्य लाभले.